“ज्ञान
विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”
- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
- शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री स्वामी
विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित
शिक्षणमहर्षी
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज
अर्थशास्त्र
विभाग
२०१९-२०
अहवाल
Certificate Course in Banking Practice
Certificate Course in Banking Practice
श्री स्वामी विवेकानंद
शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज अर्थशास्त्र विभाग आयोजित
Certificate Course in Banking Practice हा कोर्स दिनांक 03 ऑक्टोंबर 2019 ते 4
जानेवारी 2020 या कालावधीत संपन्न झाला.
या कोर्सची उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदयसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाले. यावेळी बँकिंग कोर्सेचे प्रमुख मार्गदर्शक मा. एल. व्ही. कट्टी,
सल्लागार वित्तीय साक्षरता केंद्र बँक ऑफ इंडिया, शाखा सांगली हे उपस्थित होते. उद्घाटन
समारंभाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. स्वाती हाके यांनी केले.
या कोर्ससाठी 22 विद्यार्थ्यांनी प्रवेश
घेतला. तीन महिने चाललेल्या या कोर्समध्ये मा. श्रीकांत गाडगीळ , माजी वरिष्ठ व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया ,शाखा मिरज, मा. विद्या कुलकर्णी व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र सांगली,
मा. आकाश मिरगाणे, विपणन अधिकारी बँक ऑफ इंडिया शाखा मिरज या
मान्यवरांनी ई-बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी,
टाईप्स ऑफ चेक, केवायसी, बँक अकाउंट इत्यादीबद्दल प्रात्यक्षिकासह सखोल मार्गदर्शन केले.
या कोर्स अंतर्गत बँकेची
प्रत्यक्ष कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावी याकरिता दि. आष्टा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक ली.
आष्टा, शाखा मिरज या बँकेला भेट देण्यात आली. यावेळी या बँकेचे शाखाधिकारी मा. प्रविण चौगुले यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजाबद्दल माहिती दिली चेकचे ऑनलाइन
क्लिअरिंग, चेक स्कॅन, कॅश
काउंटिंग मशीन, सेल्फ डिपॉझिट लाकर इत्यादी बद्दल
विद्यार्थ्यांच्या शंका निरसन करत मार्गदर्शन केले. भेटीसाठी अठरा विद्यार्थी
उपस्थित होते.
या कोर्स अंतर्गत एकूण 100 गुणांचे मूल्यमापन करण्यात आले.
या ज्यामध्ये लेखी परीक्षा 50 गुण, प्रकल्प 20 गुण, सेमिनार 20, गुण व गटचर्चा 10 गुण असे विभाजन करण्यात आले. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केलेल्या
विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कोर्सच्या यशस्वी
नियोजन अर्थशास्त्र विभागातील विभाग प्रमुख सौ. स्वाती हाके, प्रा.संजय पाटील, प्रा. राहुल
बनसोडे व डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले.
सौ. स्वाती
हाके
No comments:
Post a Comment