“ज्ञान,विज्ञान
आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे.
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर
संचलित,
शिक्षणमहर्षी
डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज.
अर्थशास्त्र
विभाग
अहवाल
शेतमजूर महिलांसाठी कायदेविषक जागृती कार्यक्रम
महिला या समाजाचा
अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच घटणेने त्यांना काही अधिकार तसेच काही कर्तव्ये दिली
आहेत. बर्याचदा अज्ञानामुळे महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते. म्हणूनच
स्त्रिया समाजात मोठ्या प्रमाणात अत्याचारला, अन्यायाला बळी पडतात. एक व्यक्ती
म्हणून, पत्नी म्हणून, एक कामगार किंवा
स्त्री म्हणून महिलांवर होणार्या आर्थिक, मानसिक आणि
शारीरिक अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी शासणाने केलेल्या कायद्यांची प्राथमिक
माहिती शेतमजूर महिलांना मिळावी, त्यांच्यामध्ये जागृती
निर्माण व्हावी यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज मधील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने चांदोली वसाहत कसबे डिग्रज, ता. मिरज येथे रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी कायदेविषक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महिलांना मार्गदर्शन करताना मा. सी. एस. नरवाडकर यांनी सतीचा कायदा, राजकीय, शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण विषयक कायदे, किमान
वेतन कायदा, कामाचे तास, कामाच्या
ठिकाणी मूलभूत सुविधा, आरोग्य विषयक सुविधांचा हक्क, बाळंतपण रजा, लैंगिक शोषण विषयक कायदा, महितीचा अधिकार, असंघटित कामगारांच्यासाठीचे कायदे, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी
कायदा इत्यादी बाबत माहिती दिली.
महिलांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी समाजातील शिक्षित
महिलांच्या पुढाकारची गरज आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदयसिंह
मानेपाटील यांनी व्यक्त केले. जोडधंद्याच्या
माध्यमातून शेतमजूर महिलांनी
आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्य प्रमोद
चव्हाण यांनी व्यक्त केले. शेतमजूर सौ. आरती लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख सौ. स्वाती
हाके यांनी केले.
कार्यक्रमास ४९ शेतमजूर महिला उपस्थित होत्या. प्रमुख अतिथि म्हणून
कसबे डिग्रज ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. आरिफ खाटीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे
आभार प्रा. संजय पाटील यांनी मानले. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित
महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात
आली.
विभागप्रमुख
अर्थशास्त्र विभाग
No comments:
Post a Comment