Thursday, 2 January 2020

Report of Legal Awareness Program for Agricultural Female Worker



ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार
                                              -शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे.
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित,
   शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज.
       अर्थशास्त्र विभाग     
अहवाल
शेतमजूर महिलांसाठी कायदेविषक जागृती कार्यक्रम

       महिला या समाजाचा अविभाज्य भाग आहेत. म्हणूनच घटणेने त्यांना काही अधिकार तसेच काही कर्तव्ये दिली आहेत. बर्‍याचदा अज्ञानामुळे महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव नसते. म्हणूनच स्त्रिया समाजात मोठ्या प्रमाणात अत्याचारला, अन्यायाला बळी पडतात. एक व्यक्ती म्हणून, पत्नी म्हणून, एक कामगार किंवा स्त्री म्हणून महिलांवर होणार्‍या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक अत्याचाराविरुद्ध दाद मागण्यासाठी शासणाने केलेल्या कायद्यांची प्राथमिक माहिती शेतमजूर महिलांना मिळावी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज मधील अर्थशास्त्र विभागाच्यावतीने चांदोली वसाहत कसबे डिग्रज, ता. मिरज येथे रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी कायदेविषक जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
     महिलांना मार्गदर्शन करताना मा. सी. एस. नरवाडकर यांनी सतीचा कायदा, राजकीय, शैक्षणिक व नोकरीमधील आरक्षण विषयक कायदे, किमान वेतन कायदा, कामाचे तास, कामाच्या ठिकाणी मूलभूत सुविधा, आरोग्य विषयक सुविधांचा हक्क, बाळंतपण रजा, लैंगिक शोषण विषयक कायदा, महितीचा अधिकार, असंघटित कामगारांच्यासाठीचे कायदे, हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा इत्यादी बाबत माहिती दिली.
     महिलांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी समाजातील शिक्षित महिलांच्या पुढाकारची गरज आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उदयसिंह मानेपाटील यांनी व्यक्त केले. जोडधंद्याच्या  माध्यमातून  शेतमजूर महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्य प्रमोद चव्हाण यांनी व्यक्त केले. शेतमजूर सौ. आरती लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख सौ. स्वाती हाके यांनी केले. कार्यक्रमास ४९ शेतमजूर महिला उपस्थित होत्या. प्रमुख अतिथि म्हणून कसबे डिग्रज ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा. आरिफ खाटीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. संजय पाटील यांनी मानले. महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित महिलांसाठी  अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
                                                       सौ. स्वाती हाके 
                                                        विभागप्रमुख  
                                                  अर्थशास्त्र विभाग                                      

Certificate Course in Banking Practice Exam


   
“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
                               -शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज
अर्थशास्त्र विभाग
                                                दिनांक : ०२/०१/२०२०
नोटीस

     महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभाच्यावतीने आयोजित Certificate Course in Banking Practice साठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर कोर्सची लेखी परीक्षा शनिवार दिनांक ०४/०१/२०२० रोजी सकाळी ठीक ११.०० ते १.०० या वेळेत रुम नं. ०४ (अर्थशास्त्र विभाग) येथे आयोजित केली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी वेळेवर उपस्थित राहावे.
प्राचार्य

Certificate course in Banking Practice Seminars


    
“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
                               -शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कॉलेज, मिरज
अर्थशास्त्र विभाग
                                                दिनांक : ०२/०१/२०२०
नोटीस

     महाविद्यालयातील  अर्थशास्त्र विभाच्यावतीने आयोजित Certificate Course in Banking Practice साठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सदर कोर्स अंतर्गत  शुक्रवार  दिनांक ०३/०१/२०२० रोजी सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी सकाळी ठीक ११.०० वाजता रुम नं. ०४ मध्ये (अर्थशास्त्र विभाग)  उपस्थित राहावे.
प्राचार्य

Monday, 2 December 2019

Notice for study tour



“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार”
                                      -शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज
अर्थशास्त्र विभाग
२०१९-२०
                                                    दिनांक : ०२/१२/२०१९
नोटीस

     महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, अर्थशास्त्र विभागाच्यावतीने गुरुवार दि. ०५/१२/२०१९ रोजी बळीराजा कृषी पर्यटन केंद्र, मालगाव येथे अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यानी आपली नावे दि. ०४/१२/२०१९ पर्यन्त अर्थशास्त्र विभागातील खालील प्राध्यापकांकडे द्यावीत.
सौ. स्वाती हाके
प्रा. संजय पाटील


                                                         प्राचार्य 

Thursday, 10 October 2019

Seminar Subjects for B. Com III



“&anaÊ iva&ana AaiNa sausaMskar yaaMsaazI iSaxaNap`saar”
                                                   iSaxaNamahYaI- Da^.baapUjaI saaLuMKo
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज
अर्थशास्त्र विभाग
B.Com. III , Semester V, 2019-20
Business Environment: Seminar Subjects

अ.   नं.
रोल नं.
विषय
Subject
१७०१ ते १८१०
१८५१ ते १८६०
व्यावसायिक पर्यावरण
Business Environment
१७११ ते १७२०
१८६१ ते १८७०
शेतमाल खरेदी – विक्री
Agricultural Marketing
१७२१ ते १७३०
१८७१ ते १८७९
शेतमाल किंमत विषयक धोरण
Agricultural Price Policy
१७३१ ते १७४०
अन्न सुरक्षितता
Food Security
१७४१ ते १७५०
राष्ट्रीय शेतकरी आयोग आणि कृषि नूतनीकरण योजना
National Commission on Farmers and Agricultural Renewal Action Plan  
१७५१ ते १७६०
शेतमजूर प्रकार व समस्या
Agricultural Labor : Types and  Problems
१७६१ ते १७७०
लघु उद्योग
Small Scale Industries
१७७१ ते १७८०
१९९१ चे औद्योगिक धोरण
Industrial Policy 1991
१७८१ ते १७९०
कामगार संघटना चळवळ
Trade Union Movement
१०
१७९१ ते १८००
भारतीय लोकसंख्येची वैशिष्टे
Features of Indian Population
११
१८०१ ते १८१०
बेकरी
Unemployment
१२
१८११ ते १८२०
भारतातील दारिद्र्य
Poverty in India
१३
१८२१ ते १८३०
संपत्तीतील विषमता
Wealth Inequalities
१४
१८३१ ते १८४०
काळा पैसा
Black Money
१५
१८४१ ते १८५०
ग्रामीण आणि नागरी अर्थव्यवस्थेच्या समस्या
Problems of Rural and Economy

Webinar on Career in Banking, Insurance and Other Govt. Sectors

  View Document