“ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार
यांसाठी शिक्षणप्रसार”
-शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे
श्री.स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर
संचलित,
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज.
अर्थशास्त्र विभाग आयोजित
अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत कार्यशाळा
‘भारतीय
अर्थव्यवस्था सद्यस्थिती’
अहवाल
महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्यावातीने दि ७ फेब्रुवारी २०२० रोजी
अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत ‘भारतीय अर्थव्यवस्था सद्यस्थिती’ या विषयावर
एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस अग्रणी समूहातील ६
महाविद्यालयामधून प्रत्येकी १० विद्यार्थी व १
प्राध्यापक यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र
विभाग प्रमुख सौ. स्वाती हाके यांनी केले. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील अनेक ज्वलंत
प्रश्नांची चर्चा करावी, चिंतन करावे, अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती समजून घ्यावी या
हेतूने या कार्यशाळेसाठी हा विषय निवडल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे उदघाटन व प्रथम
सत्राचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदयसिंह मानेपाटील उपस्थित
होते. या सत्राचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अनिल सत्रे, विभाग प्रमुख मोहनराव
पतंगराव पाटील महाविद्यालय, बोरगाव यांनी
‘भारतीय अर्थव्यवस्थेतील वास्तव घडामोडी-लोकसंख्या, बेकारी, दारिद्र्य, दरडोई
उत्पन्न, मानव विकास निर्देशांक, अर्थव्यवस्थेतील तिन्ही क्षेत्राचे योगदान इ.
बद्दल PPT सादरीकरनासह आकडेवारीतून सखोल मार्गदर्शन
केले व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसन केले. या सत्राचे
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदयसिंह मानेपाटील
यांनी ‘राष्ट्राचा विकास हा व्यक्ती विकासावर अवलंबून असून भारतीय अर्थव्यवस्था
सुधारण्यासाठी शेती क्षेत्राशी संबंधित प्रक्रिया उद्योगांचा विकास होणे गरजेचे आहे, असे मत मांडले. या सत्राचे आभार डॉ॰ संपदा टीपकुर्ले यांनी मानले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून
मिरज महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजेंद्र जेऊर यांनी भारतीय बँकांची सद्यस्थिती या
विषयावर मार्गदर्शन करताना १७७० ते २०१९ या कालखंडातील बँकिंग व्यवस्थेचा आढावा
घेत बँकिंग क्षेत्राची रचना,
भारतीय बँकिंग मधील महत्वपूर्ण घडामोडी, LPG धोरणांनंतरची
बँकिंग व्यवस्था या गोष्टीवर PPT सादरीकरनातून
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्राचे प्रास्ताविक प्रा. संजय पाटील यांनी केले. आभार
प्रा. राहुल बनसोडे यांनी मानले. या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातील
हिंदी विभाग प्रमुख प्रा. यशवंत गायकवाड उपस्थित होते॰
कार्यशाळेच्या तिसर्या सत्राचे अध्यक्ष महाविद्यालयातील पदार्थविज्ञान
विभागाचे प्रमुख डॉ. जे.एल.भोसले. होते. या सत्राचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग
प्रमुख डॉ. अवधूत नवले यांनी केले. आभार प्रा. स्वाती हाके यांनी मानले. यावेळी
विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थी व प्राध्यापक यांनी ही कार्यशाळा अत्यंत
उपयुक्त व अतिशय माहितीपूर्ण झाल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. या सत्राचे
अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात
आले. कार्यशाळेचे संयोजन अग्रणी महाविद्यालय योजना समन्वयक प्रा विजय पाटील यांनी
केले. सूत्रसंचालन प्रा श्रुती परचुरे यांनी केले. कार्यशाळेस प्रा. सुहास वाघमोडे, प्रा. विक्रमसिंह भोसले, प्रा. टी.एस. भंडे, डॉ. लीलावती पाटील, डॉ. पुष्पा पाटील, डॉ. अर्चना जाधव, डॉ. सचिन भोसले, प्रा. दिगंबर नागर्थवार, प्रा. जोतीराम आंबवडे, प्रा. शिरगावकर, ग्रंथपाल शुभदा जाधव, प्रा. सुरेखा व्हसमने उपस्थित होते.
सौ. स्वाती हाके
विभाग प्रमुख,
अर्थशास्त्र विभाग